*******श्री. विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास भाविकांसाठी उपलब्ध******
मंदिर
समितीच्या योजना
1)
अन्नछत्र कायमठेव योजना
श्री संत जगद्गुरू तुकाराम भवन येथील तळमजल्यावर अन्नछत्र चालविले जाते.
या योजनेमध्ये भाविकांनी गुंतविलेल्या रकमेच्या व्याजातून दरवर्षी
भाविकांनी सुनिश्चित केलेल्या तिथी/तारखेस अन्नदान करणेत येते.यासाठी
किमान ठेव रक्कम रूपये 5 हजार ठेवणे आवश्यक आहे. सध्या अन्नछत्रामध्ये
दररोज 2000 ते 3000 भाविक प्रसादाचा लाभ घेतात. अन्नछत्राची वेळ दुपारी 12
ते 2 अशी आहे.
2) महानैवेद्य कायम ठेव
श्रीविठ्ठलरूक्मिणी मंदिर समिती मार्फत श्रींस दररोज महानैवेद्य समर्पित केला जातो. या योजनेमध्ये भाविकांनी किमान रक्कमरूपये 15 हजार गुंतविलेस त्याचे व्याजातून दरवर्षी त्या भाविकांचे नांवे त्यांनी सुनिश्चित केलेल्या व समितीकडे उपलब्ध असलेल्या तारखेस श्रींस महानैवेद्य समर्पित केला जातो.
3) गोशाळा पशुखाद्य कायम ठेव योजना
मंदिर समिती संचलित यमाई तलावाचे जागेत गोशाळा असून सध्या गोशाळेत गायी, वासरे, मिळून 70 ते 80 पशुधन आहे. गोशाळेतील दररोज निघालेल्या दुधाचा श्रीं चे दैनंदिन उपचारासाठी वापर केला जातो. गोशाळेतील गायीच्या खाद्यासाठी कायमठेव योजना कार्यान्वीत केली असून या योजनेत किमान रू. 15 हजार रक्कम गुंतवल्यास त्या रकमेच्या व्याजातून भाविकांनी सुचित केलेल्या दिवशी त्यांचे नांवे गायीना खाद्य पुरविणेत येते.
मंदिर समितीचे विविध उपक्रम
1) श्रीसंत ज्ञानेश्वर दर्शन मंडप
पदस्पर्श दर्शन रांग व्यवस्था श्रीसंत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातून केलेली आहे. दैनंदिन व यात्रा कालावधीत श्रींचे दर्शनास येणाऱ्या भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था होण्यासाठी दर्शनमंडप बांधकाम करणेत आलेले आहे. दर्शन मंडपात एकूण 8 गाळे आहेत. सदरच्या 8 गाळ्यामध्ये साधारणत: 10 हजार भाविक प्रत्यक्ष दर्शन घेवू शकतात. प्रत्येक गाळ्यात स्वच्छता गृहाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच दैनंदिन व यात्रा कालावधीत मुखदर्शन व्यवस्था सभामंडपातून केली जाते.
2) जगद्गुरू श्रीसंत तुकाराम भवन
जगद्गुरू श्री संत तुकाराम भवन इमारतीमध्ये कथा, कीर्तन, प्रवचन व सप्ताह इ.धार्मिक कार्यक्रमासाठी बहुउद्देशीयी सभागृह उभारणेत आलेले आहे.या सभागृहामध्ये सुसज्ज व्यासपीठ, बाल्कनी तसेच ध्वनिक्षेपण यंत्रणा बसविण्यात आली आहे. सभागृहाची प्रेक्षक क्षमता 2000 इतकी आहे. किर्तन, प्रवचन, सप्ताह इत्यादी अध्यात्मिक प्रयोजनाकरिता सभागृहाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.
4) अन्नछत्र/प्रसादालय
संत तुकाराम भवन येथील तळमजल्यावर मंदिर समितीतर्फे मोफत अन्नछत्र चालविले जाते.या ठिकाणी दररोज दुपारी ११ ते २ व संध्या. ७ ते रात्री ९ या वेळेत प्रसाद भोजनाचे वितरण करण्यात येते. या प्रसादाचा लाभ दररोज 2000 ते 2500 भाविक घेतात. प्रत्येक एकादशीला फराळाच्या पदार्थांचा प्रसाद भाविकांना वितरीत करण्यात येतो.
5) यात्री निवास
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने अत्याधुनिक सोयी सुविधेसह श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास बांधले आहे. विशेष म्हणजे आयजीबीसी या संस्थेने या इमारतीला मानाकन दिले असून जिल्ह्यातील ही पहिली “ग्रीन बिल्डींग” ठरली आहे. या भक्त निवासामध्ये सुमारे १२०० भाविक मुक्काम करू शकतील, अशी उभारणी केली आहे. यासह इमारतीमधील सांडपाणी, पावसाचे पाणी यावर प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच धार्मिक, आरोग्यदायी तसेच देशी वृक्ष लागवड केली आहेत.या इमारतीमधील कोणतेही घाण, सांडपाणी, बाहेर न जाता त्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन केले. त्यानुसार पावसाचे वाया जाणारे पाणी, सांडपाणी या वर प्रक्रिया करून हे पाणी इमारतीतील वृक्षांना देण्यात येणार आहे.
तसेच इथे जमा झालेला कचरा खोलीच्या बाजूला असलेल्या एका ठिकाणी गोळा करण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया केली जाणार असून खत निर्मितीही केली जाणार आहे. यासाठी एक अत्याधुनिक यंत्र इमारतीमध्ये बसविण्यात आले आहे. त्याचबरोबरीने इमारतीमध्ये आग किवा अन्य दुर्घटना झाल्यास ती घटना आटोक्यात आणण्यासाठी अत्याधुनिक सामुग्री बसविण्यात आली आहे. आगीची घटना घडली तर काही सेंकदात ऑक्सिजन आणि पाण्याचा फवारा सुरु होईल. तसेच ज्या ठिकाणी आग लागली. त्या ठिकाणी “हाय प्रेशर” पाणीपुरवठा केला जाणार आहे. या शिवाय वारकरी सांप्रदायातील विविध संत मंडळींच्या महात्म्य भित्तीचित्रातून मांडले आहे.
या भक्त निवासामध्ये तुळस, झेंडू, लाल फुल, २७ नक्षत्रांची २७ वृक्षे आदी धार्मिक तसेच आरोग्यदायी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नक्षत्रांची लागवड करताना जे नक्षत्र सुरु आहे. त्या नक्षत्रावर वृक्ष लावले आहेत. या भक्त निवासमध्ये ८ लोकांना एकत्र राहता येईल असे ७८ हॉल तयार करण्यात आले आहेत. तसेच पाच लोकांना एकत्र राहता येईल असे ६३ हॉल तयार करण्यात आले आहेत. २ बेड असलेल्या ८१ रूम, दोन बेडचे व्हीआयपी वातानुकूलित ५१ रूम्स, व्हीआयपी ८ सूट, व्हीव्हीआयपी ६ सूट अशी राहण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच इथे येऊन काही महिने राहणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी वन बीएचके फ्लॅट देखील तयार करण्यात आले आहेत. एकाच वेळेला अनेक लोक जेवण करतील असे सुसज्ज शाकाहारी रेस्टॉरंट आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी २२०० चौरस मीटरचे लॉन व १५ बाय ०९ मीटरचा स्टेज देखील तयार करण्यात आला आहे. भक्तनिवासच्या दर्शनी बाजूस ४३ गाळे देखील बांधण्यात आले आहेत. तसेच २७३ चार चाकी वाहने व २०० दुचाकी बसतील अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहेत. तसेच सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली जाणार आहे.श्री.विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास संपर्क क्र. :- (०२१८६) २२८८८८, २२२१११,२२३१११ इमेल :-info.bhaktnivas@gmail.com, eotemple@gmail.com
6) लाडू प्रसाद व्यवस्था
श्रीं च्या दर्शनास यणाऱ्या भाविकांना श्रीं चा लाडूप्रसाद मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिला जातो. लाडूप्रसादामध्ये विलायची पूड, काजू, बेदाणा याचाही वापर केला जातो. प्रत्येत शुद्ध एकादशीचे दिवशी राजगिरा लाडू भाविकांना उपलब्ध करून दिला जातो.मंदिर समितीच्या लाडू प्रसादास भाविकांकडून अतिशय मागणी असते. भाविक अत्यंत भक्तीभावाने लाडूप्रसाद आपल्या नातेवाईक तसेच ईष्टमित्रांना वाटण्यासाठी घेऊन जातात.
7) फोटो व्यवस्था